• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून टोळक्याचा हल्ला

दहा जणांवर गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून टोळक्याचा हल्ला

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे १० जणांच्या टोळक्याने गावात दहशत माजवीत ३ जणांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घेण्याचा कारणावरून धारदार शस्त्राने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना बुधवार दि. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान भगवान राजाराम पाटील (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. ते परिवारासह शिरसोली येथे अशोक नगरात राहतात. बुधवार दि.१६ रोजी संध्याकाळी ७ वाजता ते शिरसोली येथील डेअरीवर दूध देण्यासाठी गेले असताना त्यांना भाचा भूषण पाटील यांचा फोन आला. विशाल भिल व दीपक भिल हे घरी आले असून ते भांडण करीत आहेत. त्यानुसार फिर्यादी भगवान पाटील हे लगेच घराकडे गेले. त्या ठिकाणी त्यांचे वडील राजाराम शिवराम पाटील, भाचा भूषण बाळू पाटील, काका अजय जयराम पाटील हे जखमी अवस्थेत दिसले.

भूषण पाटील याने सांगितले की, सायंकाळी साडेसहा वाजता भूषण पाटील आणि फिर्यादीचे वडील राजाराम पाटील हे घराच्या अंगणात बसलेले असताना गावातील विजय भील, सुखदेव भिल, विशाल भिल, दीपक विठ्ठल भिल, आकाश संजय नागपुरे, नितीन भिल, सुभाष भिल, सचिन भील, गजानन भिल, अजय भिल हे १० जण घरी आले होते.

त्यांनी शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता त्यांनी मारहाण केली. यामध्ये गजानन भिल याने हातातील चॉपरने भूषण याच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले तर अजय भिल याने लाकडी दांडक्याने भूषणला मारहाण केली. तसेच सचिन भिल याने लोखंडी हातोडीने रांजाराम पाटील यांना पाठीवर, पोटावर मारहाण केली. भांडण सोडण्यासाठी आलेले अजय जयराम पाटील यांना सुद्धा मारहाण, शिवीगाळ करून सुभाष भील याने अजय पाटील यांच्या डोक्यावर कोयता मारून गंभीर जखमी केले.

त्यावेळेला इतर ग्रामस्थ धावून आल्यानंतर टोळके पसार झाले. ग्रामस्थांनी व फिर्यादीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला वरील १० संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ऋतिक कोल्हे वर एमपीडीए

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ऋतिक कोल्हे वर एमपीडीए

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जळगाव जिल्हा

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

July 24, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

July 24, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
आरोग्य

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add