मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : पोहण्यासाठी गेलेल्या दोन संख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घटना रविवारी सालबर्डी शिवारातील तलावात घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडला असल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वेदांत कृष्णा ढाके (वय १६) व चिराग कृष्णा ढाके (वय ११) अशी मयतांची नावे आहेत. मयत भावंडांचे वडील रिक्षा चालवून तर आई शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. (केपी) सालबर्डी गावातील कृष्णा ढाके यांची वेदांत व चिराग ही दोन्ही मुले रविवारी दुपारी केस कापून आल्यानंतर सालबर्डी शिवारातील तलावावर पोहण्यासाठी गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चिराग पाण्यात बुडू लागल्यानंतर त्यास वाचवण्यासाठी वेदांत हादेखील गेला. मात्र दोघांचाही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.
या घटनेने सालबर्डी गावावर शोककळा पसरली आहे.या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे.