कला शिक्षक सुनील दाभाडे यांची कलाकृती
जळगाव, (प्रतिनिधी) दि.१३ : येथील मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक चित्रकार सुनिल दाभाडे यांनी उद्योजक रतन टाटा यांचे मिठापासून चित्र तयार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली आपल्या कलेच्या माध्यमातून वाहिली आहे. ज्यांनी घराघरात टाटा मीठ पोचवले त्याच टाटा मिठाचा वापर करून चित्रकार सुनिल दाभाडे यांनी उद्योगपती रतन टाटा यांची मिठापासून सुरेख अशी प्रतिमा तयार केली आहे.
रतन टाटा यांनी आजपर्यंत लाखो लोकांना रोजगार देण्याचे काम केले आहे. सोबत जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. ज्या ज्या वेळी भारतावर नैसर्गिक अपत्ती आली आहे. त्या त्या वेळेस रतन टाटा हे मदत करण्यासाठी सगळ्यात पुढे आलेले आहे. जसे भूकंप असेल कोरोना असेल अनेक अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांनी देशात सहकार्य केले आहे.
सुनिल दाभाडे हे नेहमीच आपल्या कलेतून वेगवेगळे प्रयोग करत असतात आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा वेगवेगळे साहित्यांचा वापर केलेला आहे. जसे की, (केपी)विटेवरी विठुरायांचे चित्र, तव्यावरील बहिणाबाई चौधरींच्या चित्र, पिंपळाच्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र मेहरूणचा बोरांपासून श्रीरामाचे चित्र अशा अनेक वेगवेगळे प्रयोग करून चित्रकार सुनिल दाभाडे हे नेहमीच वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून चित्र काढत असतात.
आजही त्यांनी मिठापासून हा नवीन प्रयोग केलेला आहे त्यांना वाटतं की मिठापासून हे जगातले पहिले चित्र असू शकते. आतापर्यंत मिठाचा वापर करून कोणीही चित्र काढलेले नाही. (केपी)त्यांना हे चित्र काढण्यासाठी पाव किलो मिठ, फेविकाॅल, पोस्टर कलर व केसरी व हिरवा रंगाची रांगोळी चा वापर केला आहे. यासाठी साधारण २४ मिनिट इतका वेळ लागला. चित्रकार सुनिल दाभाडे यांनी आपल्या कलेचा माध्यमातून उद्योगपती रतन टाटा यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.