• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंदुकीतून गोळी सुटून तरुणाच्या घुसली गालात ..!

गावठी कट्ट्याशी खेळणे भोवले ; चाळीसगावातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 5, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बंदुकीतून गोळी सुटून तरुणाच्या घुसली गालात ..!

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : शहरातील २० वर्षीय तरुण हा गावठी कट्ट्याशी आरशा समोर खेळत असताना, चुकून गोळी झाडली गेली आणि ती त्यांच्या थेट गालात घुसली आहे. हि घटना दि. ४ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली, त्याला तात्काळ रुग्ण्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या शरीरात होती. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मंजितसिंग हा त्याची आई व बहीणीसह बस स्टॅण्डच्या पाठीमागे भाड्याने राहतो. शुक्रवारी सकाळी मंजितसिंग हा त्याच्या हातातील बंदुक ही आरशात बघुन वेगवेगळ्या स्टाईलने हवेत फिरवित होता. त्यावेळी त्याने सदर बंदुकीस वरच्या बाजुस पकडुन मागे पुढे केले. (केपी)त्यावेळी मित्राने त्याला विचारले कि, मंजित तु काय करित आहे. हि बंदुक तु कुठून आणली, असे विचारले असता, त्याने त्याच्या हातातील बंदुक मित्राच्या दिशेने रोखली. तेव्हा तो घाबरून बाहेर निघुन गेला.

त्याच वेळी घरातून जोरात फटाका फुटल्यासारखा आवाज आला. तेव्हा मित्र व वडील हे घरात पळत गेले असता, मंजितसिंग हा आरशा समोर गुडघे जमिनीवर टेकून डाव्या गालाला हात लावून खाली बसलेला होता. तसेच डाव्या गालातून रक्त येत होते. मित्राने लागलीच त्याच्या आई व बहीणीस बोलावुन घेतले व त्यांना झालेला प्रकार सांगितला.(केपी) सर्वांनी त्यास मोटर सायकलवर बसवुन देवरे हॉस्पिटल येथे उपचाराकामी घेवुन गेले. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी रुग्णलयात धाव घेवून घटनेची माहिती घेतली.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला पो. उपनिरिक्षक कैलास राजधर पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. योगेश माळी करीत आहेत. दरम्यान मंजित याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस दलाकडून मिळाली.

Next Post
नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात स्वच्छता मोहीम

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात स्वच्छता मोहीम

ताज्या बातम्या

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’
मनोरंजन

जळगावात ‘परिवर्तन’तर्फे मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी रंगणार ‘आषाढस्य प्रथम दिवसे’

July 14, 2026
बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले
गुन्हे

बाळ अंध जन्माला आल्याच्या रागातून आईसह साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला विहिरीत ढकलले

July 14, 2026
ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add