• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या !

मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 5, 2024
in कृषी, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या !

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : शेतीसाठी कर्ज काढले असताना शेतीतून उत्पन्न मिळत नाही. यामुळे कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली. हि घटना बुधवारी मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे घडली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सुरेश ओंकार विटे (वय ४०, रा. रिगाव ता. मुक्ताईनगर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सदरची घटना दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.(केपी) सुरेश विटे यांची शेती असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततची नापिकी झाल्यामुळे कर्ज फेडू शकत नाही. यामुळेच डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

सुरेश विटे हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठला रिगाव शिवारातील शेतात गेले होते. यावेळी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. दरम्यान ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गौरव त्यांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला.(केपी) यावेळी गौरवला वडील शेतातील झोपडीजवळ बेशुद्धावस्थेत दिसले. त्याने वडिलांना बघून हंबरडा फोडला आणि धावत जाऊन घरी सांगितले. यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेश विटे यांनी तत्काळ शेताकडे धाव घेऊन भावाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सुरेश विटे यांना मृत घोषित केले. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Next Post
बंदुकीतून गोळी सुटून तरुणाच्या घुसली गालात ..!

बंदुकीतून गोळी सुटून तरुणाच्या घुसली गालात ..!

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add