• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 15, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला !

पिकअप व्हॅन आणि इको वाहनांच्या अपघातात ५ जण ठार

धुळे, ( वृत्तसंस्था ) : कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला झाला असून पिकअप व्हॅन आणि इको वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला . जखमींना धुळ्यातील हिरे माहाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची धडक झाली. समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्यातल्या हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व शिंदखेडा शहरातील रहिवासी असून ते कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी वारूळ पाष्टे गावाला गेले होते.

या भीषण अपघातात इको वाहनामध्ये बसलेले सुनील दंगल कोळी (कुवर ) वय 30, रा. परसामळ, तालुका शिंदखेडा, मंगलाबाई लोटन देसले (वय 59) रा. गांधी चौक, शिंदखेडा, विशाखा आप्पा माळी (महाजन) वय १३ ,रा. धानोरा ,तालुका शिंदखेडा, मयुरी पितांबर खैरनार( परदेशी) वय 28, रा. विजयनगर ,शिंदखेडा, जयेश गुलाब बोरसे, (वय 22), रा. वारूड , तालुका शिंदखेडा यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते. दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप व्हॅनने या इको कार ला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहनाचा चालक हा मदधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातामध्ये गंभीर जखमी वर हिरे वैद्यकीय मध्ये उपचार सुरू आहेत.

Tags: accidentCrimedhulesidhkheda
Next Post
फुकटची बियर न दिल्याने तीन जणांनी दगडफेक करीत लांबवली साडेचार लाखांची रक्कम

फुकटची बियर न दिल्याने तीन जणांनी दगडफेक करीत लांबवली साडेचार लाखांची रक्कम

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add