• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव नागरिक मंचच्यावतीने अशोक जैन यांनी दिले राज्यपालांकडे निवेदन

पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 11, 2024
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
जळगाव नागरिक मंचच्यावतीने अशोक जैन यांनी दिले राज्यपालांकडे निवेदन

जळगाव, (प्रतिनिधी) : येथे दीड दिवसांच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील २०० वर मान्यवर नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी सुद्धा संधी मिळाल्याने जळगावच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांच्या मागण्या राज्यपालांकडे केल्या. अजिंठा विश्रामगृहावर राज्यपाल नागरिकांना भेटले. याच दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी राज्यपालांची विशेष भेट घेतली.

अशोक जैन यांनी जळगाव नागरिक मंचच्या वतीने राज्यपालांना निवेदन सादर करीत त्यात मागणी केली की, पुणे – अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा ग्रीनफील्ड इकॉनोमिक कॉरिडोर प्रकल्पात जळगावचा समावेश करावा. हा प्रकल्प जळगाकडे विस्तारला तर दौलताबाद, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, अजिंठा लेणी, गांधीतीर्थ सुद्धा जागतिक पर्यटनाशी जोडले जातील.

ग्रीनफील्ड कॅरिडाॅरमुळे जळगाव शहर व जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, शेती उत्पादने, पर्यटन, हाॅटेल्स, ट्रॅव्हल्स अशा व्यवसायांना मोठा आर्थिक लाभ होऊन रोजगार वाढू शकेल. ही बाब अशोक जैन यांनी राज्यपालांकडे स्पष्ट केली. राज्यपालांनी निवेदन स्वीकारून त्याचा पाठपुरावा केंद्रीय मंत्रालयाकडे करणार असे आश्वासन दिले. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते. दरम्यान याच कॅरिडाॅरची मागणी ‘क्रेडाई’ चे पदाधिकारी तथा विकासक अनीषभाई शहा यांनीही केली.

Next Post
दारूच्या नशेत एकावर कुऱ्हाडीने वार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

दारूच्या नशेत एकावर कुऱ्हाडीने वार ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add