• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हृदयद्रावक : भरधाव ट्रकने दुचाकीवरील महिलांना चिरडले ! ; चिमुकला जखमी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 28, 2024
in क्रिडा, खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा, मनोरंजन, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
हृदयद्रावक : भरधाव ट्रकने दुचाकीवरील महिलांना चिरडले ! ; चिमुकला जखमी

जळगावातील मानराज पार्क येथील घटना

जळगाव (प्रतिनिधि ) ;- एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना शहरातील मानराज पार्क ते गुजराल पेट्रोलपंपादरम्यान आज बुधवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एक वर्षांचा मुलगा जखमी झाला त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर (वय १७) आणि दिक्षिता राहूल पाटील (वय २७ दोन्ही रा. द्वारकाई अपार्टमेंट, वाटिकाश्रम, जळगाव) असे मयत दोघांची नावे आहेत. द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही आई, वडील, लहान भाऊ यांच्यासह राहत होती. याच अपार्टमेंटमध्ये दिक्षिता पाटील या विवाहिता माहेरी आलेल्या होत्या. दिक्षिता पाटील ह्या नाशिक येथील रहिवाशी असून त्यांच्या वडीलांच्या नातेवाईकांचे निधन झाले होते. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून त्या माहेरी वाटिकाश्रम येथे आलेल्या होत्या.खोटेनगरकडून मानराज पार्ककडे येणाऱ्या उड्डाणपुलाच्या खाली दोन्ही महिला ह्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेवून दुचाकी क्रमांक (एमएच १८ एएस ५३७९ )ने जात असतांना दुचाकीच्या मागे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही महिला जागीच ठार झाल्या तर सोबत असलेला चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही महिलांचे नातेवाईक हे एका हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने त्यांना पाहण्यासाठी जात असतांना ही घटना घडली आहे. अपघात घडल्यानंतर पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, हेमंत निकम, दिपक राव आदींनी सहकार्य केले. दरम्यान मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.

Tags: accidentCrimeJalgaon
Next Post
गावठी कट्टा, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

गावठी कट्टा, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group