• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतात काम करताना वीज पडून शेतकऱ्यासह म्हैस ठार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 20, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शेतात काम करताना वीज पडून शेतकऱ्यासह म्हैस ठार

तालुक्यातील शिरसोली नायगाव शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शेताची कामे करीत असतांना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून तो जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील शिरसोली नायगाव शेत शिवारात मंगळवारी दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून शेतकऱ्यासह एक म्हैस देखील ठार झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

त्र्यंबक ओंकार अस्वार (बारी, वय ६८, रा. पाण्याच्या टाकीजवळ, कुऱ्हाडदा रोड, शिरसोली प्र. न. ता. जि. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, १ मुलगा, ४ मुली, नातवंडे यांच्यासह राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी दि. २० रोजी दुपारी मुसळधार पाऊस झाला. जळगाव तालुक्यात शिरसोली जवळ असणाऱ्या नायगाव शिवारातील सज्जन शाह बाबा दर्ग्याजवळ असणाऱ्या शेतात त्र्यंबक अस्वार (बारी) हे आपले शेत गट क्रमांक १६३ -२-अ -१ येथे काम करीत होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरु झाला.

त्यावेळी शेतात वीज अंगावर पडून त्र्यंबक अस्वार हे २० फुटांपर्यंत फेकले गेल्याने ते जागीच ठार झाले. तसेच त्यांची म्हैस देखील ठार झाल्याची हि घटना जवळच असणाऱ्या बकऱ्या चरणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आरडाओरडा करून हि माहिती दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ बैलगाडीतून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Tags: CrimeJalgaonshirsoli
Next Post
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

जुन्या वादातून जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने वार

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add