• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शौचालयातून आल्यावर ५ रुपये सुट्टे नसल्याने तरुणाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 20, 2024
in गुन्हे, महाराष्ट्र, राजकीय, राज्य
0
शौचालयातून आल्यावर ५ रुपये सुट्टे नसल्याने तरुणाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले !

एकाला अटक ; बदलापूर रेल्वेस्थानकावरील घटना

मुंबई (वृत्तसंस्था ) : रेल्वे स्थानकातील शौचालयाचमध्ये शौच करण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाने त्याच्याकडे 5 रुपये सुट्टे नसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने शौचालयाच्या ठेकेदाराने आणि त्याच्या 15 वर्षीय मुलाने त्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून डोळ्याला गंभीर दुखापत केल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर असलेल्या शौचालयात घडली. याप्रकरणी पोलिसांनी योगेशकुमार चंद्रपालसिंग (वय 47 ) याला अटक केली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तक्रारदार विनायक बाविस्कर (वय 28) हे 19 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शौचालयाचमध्ये गेले होते. शौच करून बाहेर आल्यानंतर बाप-लेकानं विनायककडे 5 रुपयाची मागणी केली. मात्र विनायककडे सुट्टे 5 रुपये नसल्यानं त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी बाप-लेकानं मिळून विनायकला बेदम मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं अ‍ॅसिड फेकलं. या हल्ल्यात विनायकच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलाची बालसुधारगृहात रवानगी : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत बाप-लेकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर विनायक यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात बीएनएस 2023 चे कलम 124 (1) 352, 115(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे शौचालय चालक योगेशकुमार याला अटक केली. त्याच्या 15 वर्षीय मुलाची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली.

Tags: acid atteckbadlapurCrime
Next Post
चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांचा रेल रोको

चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांचा रेल रोको

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group