• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांचा रेल रोको

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 20, 2024
in Uncategorized
0
चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांचा रेल रोको

आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी ; दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश -गृहमंत्री

बदलापूर (वृत्तसंस्था ) : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी हा शाळेतील सफाई कर्मचारी असून त्याला अटक करण्यात आल्यानंतरही पालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून झाल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येऊन संस्थेची चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलतांना दिली.

सदर प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून याचसाठी आज हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. बदलापूर शहरातील रिक्षाही आज बंद असून संतप्त बदलापूरकर प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर उतरत रेल रोको केला.

“बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे”, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवली आहे. “या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत,” असंही फडणवीसांनी सांगितलं आहे. तसेच सदर प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रस्ताव माडण्याचे आदेश दिले जातील अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

Tags: badlapurCrimedevendra fadnvis
Next Post
‘डोळे माझे मौल्यवान’ या विषयावर आज जळगावच्या कांताई नेत्रालयात कार्यक्रम

‘डोळे माझे मौल्यवान’ या विषयावर आज जळगावच्या कांताई नेत्रालयात कार्यक्रम

ताज्या बातम्या

खेळता खेळता काळाचा घाला! जळगावात १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दोरीच्या फासाने मृत्यू
जळगाव जिल्हा

खेळता खेळता काळाचा घाला! जळगावात १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दोरीच्या फासाने मृत्यू

July 8, 2025
चोपड्यातील योगिताताई ठरल्या पहिल्या पिंक रिक्षा चालक-मालक
जळगाव जिल्हा

चोपड्यातील योगिताताई ठरल्या पहिल्या पिंक रिक्षा चालक-मालक

July 8, 2025
रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण; विदगाव परिसरातील ७५० महिलांना भांडे संच वाटप
जळगाव जिल्हा

रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण; विदगाव परिसरातील ७५० महिलांना भांडे संच वाटप

July 8, 2025
मुख्याध्यापिका आणि लिपिक लाच घेताना रंगेहात पकडले; प्रसूती रजा मंजूरीसाठी मागितली लाच!
गुन्हे

मुख्याध्यापिका आणि लिपिक लाच घेताना रंगेहात पकडले; प्रसूती रजा मंजूरीसाठी मागितली लाच!

July 8, 2025
‘मुलांच्या अभिव्यक्तीचा मोरपिसारा फुलू द्या’: केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर
जळगाव जिल्हा

‘मुलांच्या अभिव्यक्तीचा मोरपिसारा फुलू द्या’: केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर

July 8, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अभिनव उपक्रम: फीच्या बदल्यात देशी बियाणे
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अभिनव उपक्रम: फीच्या बदल्यात देशी बियाणे

July 8, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group