• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुत्रे आडवे आल्याने रिक्षा झाली पलटी ; तरुण ठार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कुत्रे आडवे आल्याने रिक्षा झाली पलटी ; तरुण ठार

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाजवळील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) : धावत्या रिक्षा समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने रिक्षा उलटून तरुण जागीच ठार झाला तर चार ते पाच प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाजवळील हॉटेलसमोर घडली. यशवंत डोके (वय ३५, रा. भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव असून इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जळगावकडून भुसावळकडे जाणारी रिक्षा महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोरुन जात होती. यावेळी अचानक रिक्षा समोर कुत्र आडव आल्याने रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील प्रवासी यशवंत डोके हा तरुण जागीच ठार झाला, तर उषाबाई वारके रा. भुसावळ, चालक महेश सातव, मंगलसिंग राजपूत, शबानाबाई पिंजारी व नरेंद्र मराठे हे गंभीर जखमी झाले.

यातील शबानाबाई पिंजारी व नरेंद्र मराठे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत. जखमींना तात्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Tags: accidentCrimeJalgaon
Next Post
प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक

प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add