• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक

जळगावात जागतिक फोटोग्राफीदिन उत्साहात साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 19, 2024
in जळगाव जिल्हा
0
प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक

जळगाव (प्रतिनिधी ) – पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व छायाचित्रकार बांधवांना एकत्रित आणत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या कामांची मान्यवरांनी भरभरून स्तुती केली. प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्यावतीने सोमवारी दिनांक १९ ऑगस्ट रोजी शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करत कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे व्हाईस चेअरमन अनिल जोशी, उद्योजक रवींद्र लढ्ढा, प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर आदी उपस्थित होते.

छायाचित्रकारांना विमा कवच..
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माजी महापौर सीमाताई भोळे यांनी सर्व छायाचित्रकार तथा डिजिटल माध्यम प्रतिनिधींना जागतिक छायाचित्रण दिनाच्या शुभेच्छा देत, पोस्टाचा अपघाती विमा काढून देण्याचे यावेळी आश्वासन दिले.

पुढील अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा..
फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर यांनी बोलताना आपल्या कार्यकाळात सदस्यांच्या सहकार्याने भरीव असे कामे करता आले, त्याचबरोबर पुढील अध्यक्ष पदासाठीचे उमेदवार संधीपाल वानखेडे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर सर्वानुमते संधीपाल वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते वानखेडे यांचा शुभेच्छापर सत्कार करण्यात आला.

आणि सभागृहात हशा पिकला..
आयाज मोहसिन यांनी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या आवाजाची मिमिक्री करत शेरोशायरीने सभागृहात एकच अशा पिकवला. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री सुरेशदादा जैन, आ.एकनाथराव खडसे आदी राजकीय नेत्यांच्या आवाजाची मिमिक्री केली.

याप्रसंगी चंद्रशेखर नेवे, किशोर पाटील, आयाज मोहसीन यांनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी मांडले. सूत्रसंचलन संदीप केदार यांनी तर आभार सुमित देशमुख यांनी मानले.

यावेळी फाऊंडेशनचे अभिजीत पाटील, संधीपाल वानखेडे, सुमित देशमुख, जुगल पाटील, प्रकाश लिंगायत, पांडुरंग महाले, धर्मेंद्र राजपूत, चंद्रशेखर नेवे, किशोर पाटील, नितीन नांदुरकर, शैलेश पाटील, जयंत चौधरी, गोकुळ सोनार, कमलेश देवरे, संजय वडनेरे, सोनम पाटील, नाजनीन शेख, संदीप होले, काशिनाथ चव्हाण, विकास पाथरकर, चित्रनिश पाटील, योगेश चौधरी, बंटी बारी, उमेश चौधरी, विक्रम कापडणे, हेमराज सोनवणे, सतीश सैंदाणे, आयाज मोहसीन, सुनील भोळे, अतुल वडनेरे, जकी अहमद, वसीम खान, राजेंद्र माळी, राजेंद्र हरीमकर, ईश्वर राणा, पांडुरंग कोळी, निखिल वाणी, संदीप महाले, प्रमोद रूले, प्रकाश मुळे, विजय बारी, धर्मेश घोसर, रामू तायडे, जीवन अंभोरे, कल्पेश हिरोळकर, प्रियांक शहा, अनुप पानपाटील, पार्थ पाटील आदी छायाचित्रकार उपस्थित होते.


Tags: World Photography Day
Next Post
मजूर घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याने चार मजूर जखमी

मजूर घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याने चार मजूर जखमी

ताज्या बातम्या

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक
खान्देश

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

June 19, 2025
शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

June 19, 2025
शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
खान्देश

शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 19, 2025
सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन
जळगाव जिल्हा

सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

June 18, 2025
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !
जळगाव जिल्हा

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

June 18, 2025
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group