जळगाव | दि.११ ऑगस्ट २०२४ | राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहर जिल्हाध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी यांची शिंदखेडा विधानसभा (धुळे जिल्हा) निरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
रिकु उमाकांत चौधरी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी जळगाव शहरात लोकांच्या प्रश्नांवर अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी रिकु चौधरी यांची ही नियुक्ती केली आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी मोठी असून शिंदखेडा तालुक्यातील युवकांची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सक्रिय योगदान देईल अशा भावना रिकु चौधरी यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील यांनी चौधरी यांचे अभिनंदन केले.