जळगाव दि.०८ ऑगस्ट २०२४ | महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने वंजारी या मुख्य जातीची लाड वंजारी हि पोटजात म्हणून भटक्या जमाती (ड ) क्रमांक (३०) मध्ये समावेश करण्याला शासन आदेशांव्ये मान्यता देण्यात आली आहे. वंजारी आणि लाड वंजारी अशा मुख्य आणि पोट जाती होत्या. त्यात आता लाडवंजारी या जातीचा नव्याने समावेश केल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता.
या संदर्भातील अधिसूचना काढावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनपाचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली होती. अधिसूचना तातडीने निघाल्यास शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियासाठी पडताळणी दाखले मिळणे सोयीचे होईल, असे निवेदनात म्हटले होते.
आता महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक आयोग -२०२४ / प्र. क्र. ६०/ मावक नुसार ६ ऑगष्ट रोजी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव र. रा. पेटकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत नाईक, नामदेव वंजारी समवेत पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. हे निवेदन समस्त वंजारी समाज सेवा संस्था मेहरूण संचलित जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे देण्यात होते.