• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी ओळख व व्यवस्थापन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 2, 2024
in कृषी, जळगाव जिल्हा
0
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी ओळख व व्यवस्थापन

जळगाव | दि.०२ ऑगस्ट २०२४ | जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचा पेरा झाला आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी कापसावर पडणारी बोंडअळी ओळखता यावी. ओळखल्या नंतर त्याच प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करता येईल. यासंदर्भातील ओळख करून देणारा हा लेख…!!

प्रादुर्भाव कसा ओळखावा..
उघडलेल्या बोडावरती डाग – हे गुलाबी बोंडअळीचे प्रमुख लक्षण आहे. ही लक्षणे सुरुवातीला येणा-या फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि पिकाच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत नुकसान झाल्यावर दिसून येते.

कामगंध सापळ्यामध्ये नर पतंग अडकल्यास – कामगंध सापळ्याद्वारे मादी पतंगासारखा गंध सोडल्यामुळे नर पतंग आकर्षित होतात हे कृत्रिमरित्या बनवलेल्या सापळे गुलाबी बोंडअळीची पाहणी आणि प्रादुर्भाव ओळखण्यासाठी वापरतात.
डोम कळी – फुले पूर्णपणे उमलत नाहीत ते मुरडले जातात.

हिरव्या बोंडावर दिसणारे डाग – हे डाग गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावाचे लक्षण आहे. हिरव्या बोंडावर दिसणारे निकास छिद्र : अंदाजे १.५ ते २ मिमि व्यासाचे लहान निकास छिद्र बोंडावर असल्यास गुलाबी बोंडअळी उपस्थित असल्याचे कळते.

त्याचे व्यवस्थापन कसे करावे..
कामगंध सापळे : ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासूनच गुलाबी बोंडअळीच्या पाहणीसाठी कामगंध सापळे प्रति हेक्टर लावावेत. कामगंध सापळयात जर कमीतकमी २४ पतंग प्रति सापळा तीन रात्रीत अडकले असल्यास किंवा १० हिरव्या बोंडाचे नुकसान (आर्थिक नुकसानीच्या पातळी) झाले असेल तर उपलब्ध असल्यास ट्रायकोग्रामा बॅक्टेरी किंवा ब्रॅकॉन परजीवी चा शेतात वापर करावा अथवा किटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून खाली दिल्याप्रमाणे करावा. बागायती कापसामध्ये प्रत्येक झाडाला ८-१० हिरवी बोंडे असतील तरच फवारणी करावी. कापसाची वेचणी पूर्ण झाल्यानंतरच हिरव्या बोडाच्या संरक्षणासाठी फवारणी करावी.

सामुहिक पतंग पकडणे – कामगंध सापळयाचा वापर करून मोठ्या प्रमाणात सामुहिकरित्या नर पतंग पकडल्यास गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होईल. प्रकाश सापळे शेतात, वखारभोवती, जिनिंग मिल्स, मार्केट यार्ड भोवती हंगामात लावल्यास गुलाबी बोडअळीचा प्रार्दुभाव कमी होईल.

सप्टेंबर महिन्यात किटकनाशक क्विनॉलफॉस २०% एएफ किंवा थयोडीकार्ब ७५% डब्लूपी मात्रा प्रती १० लिटर पाणी २० मिली २० ग्रॅाम ऑक्टोबर ते नोव्हेंबर – क्लोरपायरीफॉस २०% ईसी किंवा थायोडीकार्ब ७५% डब्लूपी २५ मिली २० ग्रॅाम डिसेंबर – फेनव्हरेट २०% ईसी किंवा सायपरमेथ्रीन १०% १० मिली १० मिली – पावर स्प्रे साठी किटकनाशकाची तिप्पट मात्रा घ्यावी असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी सांगितले आहे.

Next Post
मुक्तळ येथील माजी सरपंच जितेंद्र पाटील यांची आत्महत्या

मुक्तळ येथील माजी सरपंच जितेंद्र पाटील यांची आत्महत्या

ताज्या बातम्या

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्हा

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

February 14, 2026
जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

February 13, 2026
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​
जळगाव जिल्हा

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

February 12, 2026
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

February 12, 2026
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप
गुन्हे

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

February 12, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण
कृषी

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group