• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे – डॉ. प्रवीण गेडाम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 30, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे – डॉ. प्रवीण गेडाम

विभागीय दक्षता समितीची आढावा बैठक

नाशिक | दि.३० जुलै २०२४ | तृतीयपंथीयांचे जीवनमान सुलभ होण्यासाठी त्यांना रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित शासकीय यत्रंणांनी तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करून विविध माध्यमातुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आला होते, त्यावेळी श्री गेडाम बोलत होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प , सहायक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. सहभागी झाले होते. प्रत्यक्ष बैठकीस उपायुक्त (ग्रामीण) चंद्रकांत खांडवी, उपायुक्त मंजिरी मनोलकर , जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ , उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, सहायक पोलीस आयुक्त भगीरथ देशमुख , सहायक आयुक्त देविदास नांदगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. प्रवीण गेडाम पुढे म्हणाले की, तृतीयपंथीयांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आर्थिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रोजगाराची , स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्यात.

प्रलंबित असलेल्या गृन्ह्यांचा तपासाचा वेग वाढवावा

विभागीय दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा बैठकीत सदर अधिनियमांतर्गत गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत घडलेल्या गुन्हांचा तपशील जिल्हावार आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने अत्याचारग्रस्तांना देण्यात आलेले अर्थसहाय्य व त्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी त्यानी सुचित केले. त्याचप्रमाणे प्रलंबित असलेल्या गृन्ह्यांचा तपासाचा वेग वाढवावा , याकामी कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची सर्व यत्रणांनी खबरदारी घेण्याचेही निर्देश श्री गेडाम यांनी यावेळी दिले.

विभागात ३ हजार ६७ जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलली

राज्यभरातील रस्ते, वाड्या, वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने या निर्णयाची नाशिक विभागात तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली असून आज अखेर ३ हजार ७८ जातीवाचक नावापैकी ३ हजार ६७ जातीवाचक रस्ते, वाडया, वस्त्यांची नावे बदलण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभागांकडे प्राप्त झाली आहे. त्यासंदर्भात विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त श्री गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समितीचा आज विभागाचा आढावा घेतला. यासंदर्भात सर्व शासकीय यंत्रणानी उलेखन्नीय काम केले असल्याचे श्री गेडाम यांनी सांगितले.

जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी विभागीय स्तरावरील समितीची यावेळी बैठक संपन्न झाली. या बैठकीत जादूटोणा करून आजार ठीक करण्याचे प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही डॉ. गेडाम यांनी संबंधित यंत्रणेला दिले.


 

Tags: Assistant Commissioner Devidas NandgaonkarAssistant Commissioner of Police Bhagirath DeshmukhDeputy Collector Bhimraj DaradeDeputy Commissioner (Rural) Chandrakant KhandviDeputy Commissioner Manjiri ManolkarDivisional Commissioner Dr. Praveen GedamRegional Deputy Commissioner of Social Welfare Madhav WaghZilla Parishad Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde
Next Post
येत्या २३ वर्षांत भारत तिसरी अर्थव्यवस्था असेल.. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

येत्या २३ वर्षांत भारत तिसरी अर्थव्यवस्था असेल.. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!
जळगाव जिल्हा

जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

January 27, 2026
साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव
गुन्हे

साकरीत दोन शालेय मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; परिसरात प्रचंड तणाव

January 27, 2026
आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर
खान्देश

आमदाराचा साधेपणा! व्हीआयपी सोफा नाकारून राजूमामा भोळे बसले थेट जमिनीवर

January 27, 2026
‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’
खान्देश

‘बहिणाबाई महोत्सवात’ लोकप्रतिनिधींचा गौरव; कीर्तनातून समाजप्रबोधनाची ‘भरारी’

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group