जळगाव | दि.२७ जुलै २०२४ | कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाले असून या दिवशी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर विजय मिळविला होता. हे कारगिल युद्धाचे विजयी रोप्य महोत्सव वर्ष आहे. दरम्यान सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे कारगिल युद्ध रौप्य महोत्सव वर्षानिमित्त विजय मशाल रॅली काढून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला.
यावेळी शहरातील भिलपूरा येथील सुन्नी जामा मशीद जवळून मशाल रॅली काढण्यात आली. तर इस्लामपुरा येथे रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी भारतीय सेना जिंदाबाद, अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तसेच शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत धनके, सै.अयाज अली नियाज अली, हाजी सलीम उद्दीन, जावेद पेंटर हाजी, हाजी जलालुद्दीन, हाजी शकूर बादशहा, वसीम खान, अलीम कुरेशी, शेख शफी, मेहबूब खान, गिरीश पाटील, इलियास नुरी, आताऊल्ला खान, योगेश मराठे, गुलाब अहमद रजवी, इक्बाल कुरेशी, रवींद्र खैरनार, अकबर इब्राहिम मुजफ्फर, सतीश वाणी, शेख शेख नूर मोहम्मद यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.