• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषद संस्कारासोबत कला शिक्षणाचे कार्य करणार – अभिनेत्री नीलम शिर्के

सर्व कला व लोककलांच्या महास्पर्धा घेण्याचे नियोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 9, 2024
in मनोरंजन
0
बालरंगभूमी परिषद संस्कारासोबत कला शिक्षणाचे कार्य करणार – अभिनेत्री नीलम शिर्के

जळगाव | दि. ०९ जुन २०२४ | मातृभाषा मराठीत संवाद साधण्याचे कौशल्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे कमी झालेले आहे. या सर्व मुलांना त्यांच्या मूळ बालपणाकडे, आजोबा आजींच्या गोष्टींकडे वळवून त्यांच्यात संस्कार रुजविण्याचे काम बालरंगभूमी परिषद करते. आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकांना कलाप्रकारांसह, पारंपारिक वाद्ये यांची ओळख करवून देण्यात येणार आहे. तसेच राज्यात बालरंगभूमी संमेलन घेण्यात येणार असल्याचे बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के यांनी सांगितले.

बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नीलम शिर्के या राज्याचा दौरा करून राज्यातील २५ शाखांना भेट देवून, त्या त्या ठिकाणच्या बालकलावंतांशी, पालकांशी व बालरंगभूमी परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेत आहेत. शुक्रवारी बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, बालरंगभूमी परिषदेची स्थापना पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच आलेल्या कोविड कालावधीत लॉकडाऊनमुळे प्रत्यक्षात कार्य झाले नाही. मुलांसोबत ऑनलाईन संपर्क होता. मात्र आता नव्याने कार्य सुरु करुन बालरंगभूमी परिषदेच्या कार्याला गती देण्याचे ठरविण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषदेच्या शाखा विविध कार्यशाळा व महोत्सव घेण्यासोबतच स्पेशल चाईल्डसाठीही कार्य करणार आहेत. त्यांच्या कलागुणांना सादर करण्याची संधी त्यांना देण्यात येणार आहे. मुलांच्या हातातून मोबाईल सुटून त्यांना कलाप्रकारांकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

बालकांसोबत पालकांचेही समुपदेशन करण्यात येणार असून, आगामी काळात बालनाट्य स्पर्धा, लोककला महोत्सव शाखांद्वारे घेतला जाणार आहे. या बालनाट्य स्पर्धात रंगमंचावर व रंगमंचामागेदेखील बालकलावंतच भूमिका निभावणार आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून बालकलावंत व बालप्रेक्षक घडल्यानंतर, राज्यस्तरावर महास्पर्धा व महोत्सवाच्या माध्यमातून या बालकलावंतांना राज्यपातळीवर रंगमंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांसोबत पालकांनीही बालरंगभूमी परिषदेचे सभासद होण्याचे आवाहन अभिनेत्री नीलम शिर्के यांनी केले.

बालरंगभूमी संमेलनाचे दरवर्षी आयोजन
१०० व्या अंतिम अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे रत्नागिरी येथे आयोजन होणार आहे. हे नाट्यसंमेलन सहा दिवसांचे असून, यातील तीन दिवस हे बालनाट्याला देण्यात आले आहेत. तसेच दरवर्षी बालरंगभूमी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून, वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखेला या संमेलन आयोजनाचा मान मिळणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला मध्यवर्तीच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत, जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांच्यासह मध्यवर्ती शाखेचे कार्यकारिणी सदस्य, राज्यातील शाखांचे पदाधिकारी तसेच जळगाव शाखेचे पदाधिकारी, आजीव सदस्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Next Post
आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

ताज्या बातम्या

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध
खान्देश

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

October 23, 2025
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत
खान्देश

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

October 23, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group