जळगाव, दि.१८ – रामनवमीच्या निमित्ताने जळगाव शहर पोलिस स्टेशन च्या लॉकअप मधील कैद्यांना अंथरण्यासाठी सतरंजी व पांघरूण म्हणून सोलापुरी चादर देण्यात आल्या. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता, जैन इरिगेशनचे चंद्रकांत जैन, अनिल जोशी यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.
लॉकअप मधील कैद्यांना या वस्तू मिळण्याचे सहकार्य व्हावे अशी अपेक्षा दीपककुमार गुप्ता यांनी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याकडे केली होती. त्यानुसार सदर च्या वस्तू आज शहर पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आल्यात.