• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशन कंपनीच्या ‘एग्रीकल्चर फॉरेस्टरी अँड अदर लँड यूज’ प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जैन हिल्सच्या बडी हांडा हॉल ला दि.२३ मार्च विशेष बैठकिचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 2, 2024
in कृषी
0
जैन इरिगेशन कंपनीच्या ‘एग्रीकल्चर फॉरेस्टरी अँड अदर लँड यूज’ प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव, दि.०२ – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी, वनीकरण आणि इतर जमीन वापर (Agriculture, Forestry and Other Land Use) (AFOLU) प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प शेतीचे उत्पन्न वाढवतांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास, मातीतील सेंद्रिय कार्बन सुधारण्यास आणि शेतीच्या पातळीवर कार्बन साठवणूक करण्यासाठी सक्षम करण्यास मदत करेल.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत माहितीसाठी जैन हिल्सच्या बडी हांडा हॉल येथे २३ मार्च २०२४ ला सकाळी १० ते १ वाजेदरम्यान बैठकीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्व इच्छुक सहकारी, स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि भागधारकांनी उपस्थित राहून योगदान द्यावे, अशी विनंती कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०२५७-२२५८०११ (२४९) वर संपर्क साधू शकतात.

शेतकरी क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करतात त्यांना कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी सक्षम करणे हा प्रकल्पामागील जैन इरिगेशनचा उद्देश आहे. कृषी पद्धतींमध्ये क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्याविषयी जागृती व अमलबजावणी करेल. यातून शेतीसाठी शाश्वत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देता येईल.

या प्रकल्पांतर्गत क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि पद्धतींचा समावेश केला जाईल, जसे की ठिबक सिंचन, फर्टिगेशन, सौर पंप, पुनरुत्पादक शेती पद्धती, चांगल्या कृषी पद्धती सोबतच कृषी वनीकरणही करता येईल. यातून नापिक जमिनीसुद्धा सुपिक करण्यावर भर असेल. जैन इरिगेशन हा प्रकल्प आंतरराष्ट्रीक मानांकनाच्या शिफारशींप्रमाणे (कार्बन मार्केट स्टँडर्ड) अंतर्गत विकसित साकारला जाणार आहे.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

संत ज्ञानेश्वर विद्यालयात महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

ताज्या बातम्या

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक
खान्देश

भुसावळ येथे ३५ लाखांच्या घरफोडीतील १८.८० लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर येथून दोघांना अटक

June 19, 2025
शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवसेनेतर्फे ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

June 19, 2025
शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
खान्देश

शेळ्या चोरणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 19, 2025
सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन
जळगाव जिल्हा

सानिका भन्साळीच्या ‘रंग सपना’ चित्र प्रदर्शनाचे गुरूवारी उद्घाटन

June 18, 2025
बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !
जळगाव जिल्हा

बहिणाबाई सोपानदेव चौधरी साहित्य संमेलनाचे नियोजन निश्चित !

June 18, 2025
थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार
खान्देश

थरारक पाठलाग : दरोड्याचा कट उधळला; एकाला अटक, ४ फरार

June 17, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group