जळगाव, दि.२० – ‘जे जे उत्तम उदात्त म्हणती, ते ते शोधत रहावे जगती’ या धारणेनुसार राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावरील कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व भवरलालजी जैन यांनी सामाजिक बांधिलकीच्या संस्कारातून सेवाभावी संस्थांची स्थापना केली असून या संस्थांचे कार्य सर्वसमावेशक आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन आणि त्यांचा परिवार हा वसा आणि वारसा पुढे चालवत आहेत. समाजाचं आपण देणं लागतो. त्या ऋणातून उतराई होण्याच्या भावनेतून हे कृतज्ञतापर कार्य सुरू आहे.
“कलागुणांच्या विकासासाठी साहित्य, शिल्प, नाट्य, संगीत, नृत्य, चित्र अशा विविध क्षेत्रातील कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी श्रेष्ठ कवयित्री बहिणाई पुरस्कार १९९१ पासून, श्रेष्ठ गद्यलेखक ना. धों. महानोर १९९२, श्रेष्ठ कवी बालकवी ठोमरे पुरस्कार २००७ तर कांताई साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार २०२० पासून महाराष्ट्राच्या विविध भागातील कलावंतांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहेत.
प्रस्तुत पुरस्कार समारंभपूर्वक दिले जातात.
नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात त्या व्यासपीठावरून विविध विषयांवर पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि निवड समितीने सदस्यांनी आपली मत मांडलीत. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करणारी संस्था व्यासपीठावरून व्यक्त करण्यात आलेल्या विचारांशी सहमत असतेच असे नाही. व्यासपीठावरून व्यक्त झालेले विचार त्या-त्या साहित्यिकांची वैयक्तिक आहेत, याचा आयोजक आणि प्रायोजक संस्था म्हणून या विचारांना समर्थन नसते.’’ अशी भूमिका अशोक जैन यांनी मांडली.