• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संवेदना फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी.. -आ.एकनाथ खडसे

निराधार पाल्य व सेवाभावी संस्थांचा गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 11, 2024
in जळगाव जिल्हा
0
संवेदना फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी.. -आ.एकनाथ खडसे

मुक्ताईनगर, दि.११ – संवेदना फाउंडेशनतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी मतदारसंघातील इयत्ता दहावी बारावीतील गुणवंतांच्या सत्कारासह सेवाभावी संस्था आणि निराधार पाल्यांचा केलेला सत्कार हा सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी राहील. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मना-मनामध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांना अधिक प्रगती साधणे सहज शक्य होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून अधिक जिद्दीने, चिकाटीने परिश्रम करून अपेक्षित यश साध्य करावे आणि आई-वडिलांचे नाव रोशन करावे. असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आ. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.

संवेदना फाउंडेशन तर्फे येथील गोदावरी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याप्रसंगी आ. खडसे बोलत होते. यावेळी ईश्वर रहाणे, यु. डी. पाटील, निवृत्ती पाटील, विनोद तराळ, सोपान पाटील, सुधीर तराळ, रमेश खाचणे, नितीन कांडेलकर, राजु माळी, निलेश पाटील, प्रमोद धामोडे, प्रवीण कांडेलकर, भागवत पाटील, महबूब भाई, मुन्ना बोंडे आदींसह विविध शाळांचे मुख्याध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते.

दरम्यान कार्यक्रमात ॲड. रोहिणी खडसे यांनी प्रास्ताविकातून यशस्वी मुलामुलींच्या कौतुकासोबतच त्यांच्या पालकांचेही विशेष अभिनंदन केले. संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून यापुढेही गौरवाची ही परंपरा कायम चालू राहणार असल्याचा शब्द दिला. दरम्यान मतदार संघातील ज्या मुला मुलींचे छत्र हरवले आहे, अशा निराधार मुला-मुलींसह मातांना तसेच सेवाभावी सामाजिक संस्थांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात सुमारे ३०० शालेय गुणवंत विद्यार्थी, २२ निराधार पाल्य आणि आठ सेवाभावी संस्थांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. बी. साळवे, रंजना महाजन योगिता पाटील यांनी केले.

Next Post
ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर.. – दिलीप चौबे

ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर.. - दिलीप चौबे

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add