जळगाव, दि.११ – वाहतूकदारांच्या संपामुळे गॅस सिलेंडर पोहोचवण्यास विलंब होतो आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याने खान्देश एलपीजी डीलर्स एसोसिएशन चे अध्यक्ष दिलीप चौबे यांनी दिलगीरी व्यक्त केली.
मात्र सध्या सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपामुळे आम्हाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. गॅस सिलेंडर पोहोचवण्यास विलंब होत असून यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत.
वाहतूकदारांच्या संपावर तोडगा निघून जेव्हा ही पुरवठा साखळी सुरळीत होईल तेव्हा गॅस सिलेंडर वेळेवर पोहोचवण्यात येईल. तोपर्यंत ग्राहकांनी कृपया सहकार्य करावे असे आवाहन खान्देश एलपीजी डीलर्स एसोसिएशन चे अध्यक्ष दिलीप चौबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.