जळगाव, दि.०८ – येथील जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनी झालेल्या हिरक-महोत्सवी समारंभात जेष्ठ रंगकर्मी व वरिष्ठ पत्रकार संजय निकुंभ यांना सांस्कृतिक क्षेत्रात, गत वर्षातील १२ महिन्यातील विविध १२ प्रकारात विशेष कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘आर्टीस्ट ऑफ द इयर’ने सन्मानित करण्यात आले.
संजय निकुंभ यांना वर्षभरातील या १२ क्षेत्रातील विविधांगी यशासाठी दिग्दर्शक चिंतामण पाटील, रमेश भोळे, आनंद मल्हारा, सचिन मुसळे, सचिन जाधव, गणेश सोनार, प्रशांत सोनवणे, किरण अडकमोल, अविनाश जाधव, योगेश शुक्ल, डॉ.रेखा महाजन, दुष्यंत जोशी, अधिवक्ता प्रदीप कुलकर्णी, शरद भालेराव, विनोद ढगे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. वर्षभर सातत्यपूर्ण लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतेय.