अमळनेर, दि.०९ – येथे होणाऱ्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे भूमिपूजन १० जानेवारी ला करण्यात येणार आहे. इंग्लंडस्थित विचारवंत डॉ.संग्राम पाटील यांच्या हस्ते संमेलनाच्या नियोजित भूमिवर प्रतीकात्मक नांगरणी करून कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीचे भूमिपूजन करण्यात येईल. यावेळी उद्योगपती प्रविण साहेबराव पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
साने गुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात वाचक, रसिक व श्रोत्यांशी “काय करू आता धरूनिया भीड” या विषयावर संवाद साधणारा कार्यक्रम विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी अमळनेर शहरातील साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाले मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.