• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

झेलम एक्सप्रेसमधील बॅग चोरीचा छडा; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ‘गोल्डन’ला ठोकल्या बेड्या

​दागिने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक; एकाचा शोध सुरू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 9, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
झेलम एक्सप्रेसमधील बॅग चोरीचा छडा; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ‘गोल्डन’ला ठोकल्या बेड्या

​जळगाव, (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेमधून प्रवाशांचे सामान लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. झेलम एक्सप्रेसमधून १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

​अयोध्या येथील रहिवासी आनंद मोर्या हे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झेलम एक्सप्रेसने प्रवास करत होते. जळगाव ते भुसावळ दरम्यान रेल्वे धावत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग लंपास केली. या बॅगेत सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. मोर्या यांनी याप्रकरणी इटारसी रेल्वे पोलीस ठाण्यात ‘शून्य’ क्रमांकाने तक्रार दाखल केली होती, जी पुढील तपासासाठी भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती.

​या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, जळगावमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (रा. फातेमा नगर) आणि सोनू जयसिंग बागडे (रा. जाखनी नगर) यांनी हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.

​मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने सापळा रचून फातेमा नगर परिसरातून समीर शेख उर्फ गोल्डन याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कारवाईसाठी भुसावळ रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

​ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील आणि रवींद्र कापडणे यांचा समावेश होता.
​


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add