• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कान्ह ललित कला केंद्र जळगावची एकांकिका ‘कंदील’ची राष्ट्रीय स्तरावर निवड

२७ राज्यातील युवकांचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 1, 2024
in जळगाव जिल्हा
0
कान्ह ललित कला केंद्र जळगावची एकांकिका ‘कंदील’ची राष्ट्रीय स्तरावर निवड

जळगाव, दि.०१ – क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेमार्फत राज्यस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन दिनांक २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान उदगीर, जि. लातूर या ठिकाणी करण्यात आले होते. महाराष्ट्रातील आठ महसूल विभागातून कान्ह ललित कला केंद्र, जळगावची वैभव मावळे लिखित एकांकिका कंदीलने आठ विभागातून प्रथम पारितोषिक पटकावून तिची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.

कान्ह ललित कला केंद्र, विभाग नाशिक आता २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रतिनिधित्व करणार के.सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, सांस्कृतिक समन्वयक व प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर व प्रा. डॉ एस.एन भारंबे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कान्ह ललित कला केंद्राचे संचालक प्रा. प्रसाद देसाई यांच्या नेतृत्वात संघाने यश मिळवलेले आहे.

१२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे म्हणजेच युवादिनाचे औचित्य साधत साजरा होणार्या २७ व्यां राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी २७ राज्यातील युवकांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेमार्फत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या संकल्पना आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश करण्यात आलेले आहेत.

या स्पर्धांच्या माध्यमातून प्राथमिक, विभागीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर युवांना आपल्या कला दाखवण्याचा आणि त्यात पारंगत होण्याचा बहुमान मिळत असतो. त्याचप्रमाणे त्यांना शासनातर्फे प्रमाणपत्रासह रोख रकमेचे ही बक्षीस मिळत असल्याने यामुळे युवांचा उत्साह द्विगुणीत होत असतो. यात आता कान्ह ललित कला केंद्राने एकांकिका या कला प्रकारात पहिले बक्षीस मिळवून् बाजी मारली असून पुढील १२ जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी चमू सज्ज झाला आहे . विद्यार्थ्यांना प्रा. पियुष बडगुजर, दिनेश माळी, प्रा. अजय शिंदे, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. वैभव मावळे, प्रसाद कासार आणि प्रा. हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी उपसंचालक नाशिक क्रीडा विभाग तथा जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव रवींद्र नाईक यांनी शुभेच्छा दिल्या.


 

Next Post
शास्त्रीय गायन, कथ्थक जुगलबंदीने बालगंधर्व संगीत महोत्सवाची होईल सुरवात

शास्त्रीय गायन, कथ्थक जुगलबंदीने बालगंधर्व संगीत महोत्सवाची होईल सुरवात

ताज्या बातम्या

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 22, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add