जळगाव, दि.२९ – राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खेळाच्या सुरुवातीला अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका निशा जैन यांनी स्पर्धक खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “ना जितने की खुशी ना हारने का गम, तुम ये खेल रहे हो ये क्या है कम” अशा शायराना अंदाजात सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला.
दुसऱ्या फेरीमध्ये मुलींच्या गटात अग्रमानांकित पश्चिम बंगाल ची मृत्तिका मल्लिक ने रोमहर्षक सामन्यात केरळ च्या आदिती अरुण चा पराभव केला. शुभी गुप्ता, साची जैन, स्नेहा हळदर, अर्शिया दास, राजण्या दत्ता, सपर्या घोष आदी मानांकित खेळाडूंनी सहज विजय नोंदवले. खुल्या गटात कँडीडेट मास्टर मयंक चक्रवती ने स्नेहल रॉय चा धुव्वा उडविला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पटावर शेख सुमेर मुहम्मद इम्रान ने सहज विजय प्राप्त केला. पण चवथ्या पटावर तामिळनाडू च्या यशवंतने बरोबरीत रोखले.
महाराष्ट्र राज्य १५ वर्षाखालील सब ज्युनिअर स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडूंनी आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीअखेर, मुलांच्या गटात दहा खेळाडू ३ गुणांसह आघाडीवर असून, आठ खेळाडू अडीच गुणांसह द्वितीय क्रमांकावर आहेत. पहिल्या पटावर मयंक ने तामिळनाडू च्या रोहिथ एस वर आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या पटावर तेलंगणाच्या शैक सूमेर ने फ्रेंच बचाव पद्धतीचा आक्रमक वापर करत प्रणय वर आघाडी घेत विजय मिळविला. तिसऱ्या फेरीअखेर मुलींच्या गटात ७ खेळाडू ३ गुणांसह आघाडीवर असून, ५ खेळाडू अडीच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.