जळगाव, दि.०९ – येथील समस्त लाड वंजारी समाज, श्री राम मंदिर संस्था मेहरूण यांच्या वतीने स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त मंगळवार, १२ डिसेंबर रोजी रॅली, रक्तदान शिबिर, क्रिकेट स्पर्धा यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात १२ डिसेंबरला सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथुन रॅलीस प्रारंभ होईल. रॅली कोर्ट चौक मार्गाने इच्छादेवी चौफुली लाडवांजरी समाज मंदिर येथे समारोप होईल. तसेच रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात लाडवंजारी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
त्याच बरोबर दि. ११ ते १४ जानेवारी २०२४ रोजी समस्त लडवांजरी समाज क्रिकेट प्रीमियम लीगअंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच २२ जानेवारी रोजी श्री राम उत्सवनिमित्ताने समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरूण येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव कथेचे निरुपण बीड येथील साई गोपालजी देशमुख करतील. सर्व कार्यक्रमांसाठी समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन समितीचे प्रमुख माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.