जळगाव, दि.०८ – आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या पाठपुराव्याने राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जळगावातील मुख्य रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ४० कोटी रूपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.
यातून खेडी ते अजिंठा चौफुली तसेच खोटेनगर ते बांभुरी पूल या समांतर रस्त्यांसह महत्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. सर्व रस्ते हे कॉंक्रिटीकरणात व उत्तम दर्जाचे व्हावे हाच प्रयत्न असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
▪️निधीतून होणारी कामे..
शिवाजीनगर ते ममुराबाद रस्त्याला जोडणारा मार्ग, शिवाजीनगर पोलीस चौकी ते जुने हुडको नगर, पिंप्राळा ते सावखेडा, झाशीची राणी पुतळा ते टावर चौक, नेरी नाका ते झाशीची राणी पुतळा, मोहाडी रस्ता, गिरणा पंपिंग रस्ता, हायवे समांतर रस्ता (खोटे नगर ते बांभोरी पूल), हायवे समांतर रस्ता (अजिंठा चौफुली ते खेडी), हायवे समांतर रस्ता (बेंडाळे स्टॉप ते खोटे नगर)
या निधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले.