जामनेर, दि.07- तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कांग नदीला मोठा पूर आलायं. दरम्यान तालुक्यात अतिवृष्टी व चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून ओझर, तोंडापुर, तळेगाव, लहासर, बेटावद, मोयखेडादिगर आदी गावात पाणी शिरून घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झालेय.
केळी, कपाशी उन्मळून पडली तर ओझर गावात चक्री वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडाली. तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. ओझर-टाकरखेडा गावाला जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असून जामनेर ते भुसावल गावाचा संपर्क तुटलायं.
पहा.. VIDEO
https://youtu.be/_LlrJh8o3ww