जळगाव, दि. ०४ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ सोमवार पासून, दि. ४ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान मेहरूण मध्ये अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमद् भागवत ग्रंथ पुजन माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत नाईक, अर्चना नाईक उपस्थित होते.
सप्ताहाचे हे २३ वे वर्ष असून सप्ताहात काकडआरती, किर्तन, प्रवचन, हरीपाठ याचा आस्वाद परिसरातील नागरिक घेत असतात तरी जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थिती देवून सप्ताहाची सार्थकता करावी, असे आवाहन प्रशांत नाईक यांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरूण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, साई दत्त गृप महाजन नगर, वंजारी युवा संघटना, एक गाव एक गणपती मित्र मंडळ, श्री स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळ, सुभाषचंद्र नेताजी चौक, श्री संत ज्ञानेश्वर प्राथ. विद्यालय शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच मेहरूण परिसरातील ग्रामस्थ मंडळी यांचे सहकार्य लाभत आहे.