जळगाव, दि.२३ – शहरात चोरी, दरोडे व इतर घटनावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून शहरातील विविध भागात कॅमेरे लावण्यात आले. त्याचबरोबर लोकसहभागातून कॅमेरे लावावे यासाठी ‘एक कॅमेरा पोलीसांसाठी’ हा उपक्रम पोलीस प्रशासनाने हाती होता. याला प्रतिसाद देत मेहरूण परिसरातील महापालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी चाळीस हजार किमतीचे चार कॅमेरे पोलिसांना भेट दिले.
याची दखल घेत पोलीस महानिरीक्षक डाॅ. बी.जी.शेखर पाटील यांनी सामाजिक सेवेबद्दल पोलीस प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमात माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांना सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले. यावेळी जळगाव शहराचे आ. सुरेश भोळे, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.