• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाडवा पहाटच्या मैफिलीने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 14, 2023
in जळगाव जिल्हा
0
पाडवा पहाटच्या मैफिलीने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

जळगाव, दि.१४ – कला व संस्कृती संचालनालय, गोवा व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात करण्यात आले. या मैफिलीस कै. नथुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य लाभले.

प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे मयूर पाटील यांनी गुरुवंदना सादर केली. मेजर नानासाहेब वाणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे तसेच विश्वस्त डॉ. अपर्णा कासार यांनी कलावंतांचे स्वागत केले. त्यानंतर सुरू झाला स्वरसखींचा स्वरप्रवास. सुरवातीला राग नटभैरव रागातील विलंबित एकतालातील बडा ख्याल “ओ समझत नाही ” हा ख्याल अत्यंत दमदार पणे सादर केला त्यानंतरची तिनतालातील बंदिश “जान करीये, गुण की चर्चा सो” राग नटभैरव मधील जय जय गौरी शंकर नाटकातील वसंत देसाई यांनी संगीत बद्ध केलेले नाट्यपद सादर केले.

त्यानंतर दोन भारतरत्नांनी गाऊन अजरामर केलेले ‘बाजे मुरलिया बाजे’ हे गीत सादर करून कार्यक्रम एका उंचीवर नेला. समर्थ रामदासांची रचना सादर केली. कार्यक्रमाचा समारोप सं. कटयार काळजात घुसली या नाटकातील अजरामर गीत ‘सूरत पिया बीन’ हे गीत सादर करून पाडवा पहाट या मैफिलीची सांगता झाली. आभार प्रदर्शन दिपक चांदोरकरांनी केले. तसेच २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ५, ६, ७ जानेवारीला होणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.

Next Post
तहसील कार्यालय परिसरातून वाळूचे वाहन चोरीचा प्रयत्न

तहसील कार्यालय परिसरातून वाळूचे वाहन चोरीचा प्रयत्न

ताज्या बातम्या

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!
खान्देश

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group