जळगाव, दि.१४ – मुक्ताईनगर शहरातील कल्पेश विजय सपकाळे याची अग्निवीर अंतर्गत नेव्ही मध्ये नुकतीच निवड झाली. मुक्ताईनगर तालुक्यातील अग्निवीर अंतर्गत नेव्ही मध्ये निवडला जाणारा कल्पेश हा पहिलाच युवक आहे, याचीच दखल घेत गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकीताई पाटील यांनी अग्निवीर कल्पेश सपकाळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान केला.
या दिवाळी पर्वात, या आनंददायी निवडीमध्ये मुक्ताईनगर येथील कल्पेश सपकाळे यांचे वडील विजय सपकाळे, अशोक महाजन, अतुल माळी, धनंजय सापधरे, समाधान राखुडे, सुमित बोंडे, प्रणव नेहेते, सुविध्द सोनवणे आणि संपूर्ण सपकाळे परिवार उपस्थित होता.
मुलांच्या यशात आई – वडिलांचे श्रम व संस्कार असतात त्यामुळे कल्पेश च्या पालकांचे देखील डॉ. केतकी पाटील यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी,उपस्थित युवकांशी संवाद साधतांना युवाशक्तीने त्यांच्या क्षमतांचा उपयोग राष्ट्रासाठी करण्याचे मार्गदर्शन ही डॉ.केतकीताई यांनी केले.