जळगाव, दि.१४ – शहरातील सुप्रीम कॉलनीभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी संपन्न झाले. आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या स्थानिक विकास निधीतून हे विकास कामे होत आहे. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यात प्रभाग क्र.१९ सुप्रीम कॉलनी परिसरातील गट नंबर १६८/२ अ ओपन स्पेस सुसोभीकरण, संत गजानन बाबा मंदिर परिसर येथे वाॅल कंपाउंड, गट क्र.९६६/२+३ व गट क्र.१६६/१+४ विठ्ठल मंदिर संस्थान आणि नवनाथ मंदिर येथील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले.
यावेळी महानगर उपाध्यक्ष विजय वानखेडे, प्रदीप रोटे, महानगर सचिव विठ्ठल पाटील यांच्यासह गजानन महाराज भक्त परिवार, विठ्ठल रुख्मिणी संस्थानातील व नवनाथ मंदिर परिसरातील सर्व भक्त परिवार आणि सुप्रीम कॉलनीतील सर्व नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.