• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोंडगाव पीडितेच्या कुटुंबास पाच लाखांचा निधी मंजूर

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतनिधी ; जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुटुंबास मदतनिधीचा धनादेश दिला जाणार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 17, 2023
in जळगाव जिल्हा
0
गोंडगाव पीडितेच्या कुटुंबास पाच लाखांचा निधी मंजूर

जळगाव, दि.१७ – भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा मदतनिधी पिडितेच्या कुटुंबाच्या बॅंक खात्यात वर्ग केला जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना ३० जुलै २०२३ रोजी घडली होती. यात संशयित आरोपी म्हणून स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय – १९) याला अटक करण्यात आली आहे.

या घटनेची तात्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता‌. पाचोरा येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबास शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल. अशी घोषणा केली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या घोषणेची प्रतिपूर्ती केली आहे‌.

महाराष्ट्र शासनाकडून पीडितेच्या कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांचा मदत निधी वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच मदतनिधीचा धनादेश गोंडगाव येथे जाऊन दिला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Next Post
जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी ; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी ; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

ताज्या बातम्या

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त
गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group