• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयांना तात्काळ भेटी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 6, 2023
in आरोग्य
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

नवी दिल्ली, दि.०६ – राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी, आणि सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महत्त्वाच्या बैठकांसाठी नवी दिल्ली येथे आलेल्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

नवी दिल्ली येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतलेल्या या बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांचेसह आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. नांदेड आणि घाटी येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही श्री. शिंदे यांनी यावेळी दिला. औषध खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांनाही अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मनुष्यबळ कमी असल्यास आउटसोर्सिंग करण्याचे अधिकारही जिल्हास्तरावर देण्यात आलेले आहेत, त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना साधनसामुग्री, मनुष्यबळाअभावी विलंब झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल आणि औषधे, मनुष्यबळाची कमतरता ही कारणे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारही मुख्यमंत्र्यांनी दिला. औषधांच्या उपलब्धतेबाबत राज्यस्तरीय डॅशबोर्ड आहे, त्याचा प्रभावी वापर सर्व रुग्णालयांनी करावा, जेणेकरून तातडीने आवश्यक औषधांची खरेदी करणे शक्य होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

Next Post
युवारंग- २०२३ चे यंदा मुळजी जेठा महाविद्यालयात आयोजन

युवारंग- २०२३ चे यंदा मुळजी जेठा महाविद्यालयात आयोजन

ताज्या बातम्या

प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका
खान्देश

प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा धडाका

January 7, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा प्रभाग १३ मध्ये मतदारांच्या भेटीगाठींवर दिला भर
खान्देश

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा प्रभाग १३ मध्ये मतदारांच्या भेटीगाठींवर दिला भर

January 7, 2026
बंडखोरांना जनता थारा देणार नाही; घराणेशाहीवर मुख्यमंत्र्यांचे जळगावात मोठे विधान
खान्देश

बंडखोरांना जनता थारा देणार नाही; घराणेशाहीवर मुख्यमंत्र्यांचे जळगावात मोठे विधान

January 6, 2026
शिवसेनेचे (उबाठा) जोरदार शक्तीप्रदर्शन; कुलभूषण पाटील व उज्वला पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

शिवसेनेचे (उबाठा) जोरदार शक्तीप्रदर्शन; कुलभूषण पाटील व उज्वला पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 6, 2026
भाजप उमेदवारांच्या रॅलीला प्रभाग ७ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडून विजयाचा निर्धार
खान्देश

भाजप उमेदवारांच्या रॅलीला प्रभाग ७ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; चंद्रशेखर अत्तरदे यांच्याकडून विजयाचा निर्धार

January 6, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा प्रभाग १२ मध्ये प्रचाराचा धडाका; माजी आ. संतोष चौधरी यांची उपस्थिती
खान्देश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा प्रभाग १२ मध्ये प्रचाराचा धडाका; माजी आ. संतोष चौधरी यांची उपस्थिती

January 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group