जळगाव, दि.१९ – शिवसेना (ठाकरे गट)तर्फे राज्यभर होऊ द्या चर्चा हे अभियान घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या पूर्वतयारीची बैठक सोमवारी जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, पियुष गांधी अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख झाकीर पठाण, महिला आघाडी महानगरप्रमुख गायत्री सोनवणे, मनीषा पाटील, नीलू इंगळे, विमल वाणी, निता संगोळे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात होऊ द्या चर्चा हे अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठीचे माहिती देण्यात आली. शहरातील प्रत्येक वार्डात प्रत्येक गाव पातळीवर हे अभियान यशस्वीपणे कसे राबवता येईल, यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत चर्चा करण्यात आली. तसेच अभियाना संदर्भात माहिती देण्यात आली.
याप्रसंगी उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड फरीद खान, शाकीर खान, विभाग प्रमुख किरण भावसार, शोएब खाटीक, युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय लाड, राहुल परचा, अशपाक पिंजारी आदींसह जिल्ह्यातील व शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत सुरळकर यांनी केले.