• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जळगावात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल राज्यांच्या वरिष्ठ महिला संघांचा सहभाग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 14, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जळगावात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

जळगाव, दि.१४ – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि.१५ ते २३ सप्टेंबर दरम्यान होतील. वरिष्ठ गटाच्या ८० महिला खेळाडूंचा यात सहभाग असेल. महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ या स्पर्धेत असतील. जळगाव येथे प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय संघातील महिला खेळाडूंचाही समावेश आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जाईल

या स्पर्धेत प्रत्येक सामना हा २० षटकांचा असेल व तो साखळी पद्धतीने खेळविण्यात येईल. प्रत्येक संघाशी दोनदा लढत देईल. व स्पर्धेतील गुणतालिकेतील प्रथम दोन संघात अंतिम लढत होईल. या स्पर्धेसाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे विजयी, उपविजयी संघाला चषक देण्यात येईल. तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वात्कृष्ट खेळाडूला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ट यष्टिरक्षक व मालिकावीर अशी वैयक्तिक पारितोषिके सुद्धा देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उदघाटन दि.१५ सप्टेंबर ला सकाळी ८.३० वाजेला अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर होईल. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सील सदस्य व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे (परभणी), अॅपेक्स कौन्सील सदस्य राजेंद्र काणे (जालना), जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रमेशदादा जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार व युसूफ मकरा, सहसचिव अविनाश लाठी, सचिव अरविंद देशपांडे व कार्यकारिणी सदस्य स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहतील. स्पर्धेचा उद्घाटन सामना महाराष्ट्र विरूद्ध त्रिपुरा यांच्यात सकाळी ९ वाजेला रंगेल. तर दुपारी १ वाजेला तामिळनाडू विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात होईल.

अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे, अॅपेक्स कौन्सिल सदस्य राजेंद्र काणे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी दिली.

Next Post
ना.धों.महानोर यांच्या जयंतीनिमित्त जळगावात ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली कार्यक्रम

ना.धों.महानोर यांच्या जयंतीनिमित्त जळगावात ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली कार्यक्रम

ताज्या बातम्या

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group