जळगाव, दि.१५ – कविवर्य ना. धों. महानोर यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि.१६ सप्टेंबर २०२३ ला रात्री ८ वाजता ‘हा कंठ दाटूनी आला’ स्वरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश खुला ठेवण्यात आला असून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व परिवर्तन तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वरांजली कार्यक्रमात कविता वाचन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संदीप मेहता, श्रीकांत देशमुख, सदानंद देशमुख, सिसिलिया कार्व्हलो, रेखा महाजन, हर्षल पाटील, शशिकांत महानोर, पूर्णिमा हूंडीवाले, सोनाली पाटील, जयश्री पाटील, सुनीला भोलाणे, नेहा पवार करतील. तर गायन सुदिप्ता सरकार, श्रद्धा कुळकर्णी, मंजुषा भिडे, रजनी पवार, चंद्रकांत इंगळे, ऐश्वर्या परदेशी, अक्षय गजभिये करतील.
त्यांना साथ संगत भूषण गुरव, योगेश पाटील, रोहित बोरसे यांची असेल. निवेदन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांचे असेल. कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची असून सुत्रधार विनोद पाटील असतील. जळगावकर रसिकांना कार्यक्रमात प्रवेश खुला असून जास्तीतजास्त संख्येने उपस्थिती राहून स्वरांजली मैफलची अनुभूती घ्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.