• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनला तिमाही आर्थिक ३६.६ कोटींचा नफा

गत वर्षाच्या तुलनेत तीनपट नफा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 12, 2023
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनला तिमाही आर्थिक ३६.६ कोटींचा नफा

जळगाव, दि.१२ – भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज पहिल्या तिमाहीचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर केले. नुकतीच जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत कंपनीने गत वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात तीनपटीहून अधिक म्हणजेच ३६.६ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे.

सध्या कंपनीच्या हातात एकूण १९२९ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. त्यात अन्न प्रक्रिया विभागाकडे १००१.३ कोटी रुपयांच्या, हायटेक अॅग्री इनपुटसकडे ४०४.१ कोटी तर प्लास्टिक विभागाकडे ५२३.६ कोटी रुपयांच्या भरभक्कम ऑर्डर्स असल्याचे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

कंपनीच्या तिमाहिच्या एकत्रीत महसुलाचा विचार केला असता गत आर्थिक वर्षात १४१६.२ कोटी रुपये होता तो या आर्थिक वर्षात २०.१ टक्क्यांनी वाढून १७०१.० कोटी रुपये झालेला आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १८०.४ कोटी रुपये तर या वर्षी ती २५.९ टक्क्यांनी वाढून २२७.१ कोटी रुपये इतकी झाली. एकत्रित कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तो ११.८ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी तिप्पट झाला आहे म्हणजेच ३६.६ कोटी रुपये इतका झालेला आहे.

कंपनीचा गत आर्थिक वर्षातील एकल महसुल हा ८६१.७ तर ह्या वर्षी ३२.९ टक्क्यांनी वाढून ११४६ कोटी रुपये झाला. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १०९.७ कोटी तर या वर्षी ती ४३.४ टक्क्यांनी वाढून १५७.३ कोटी रुपये इतकी झाली. कंपनीच्या एकल कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तोटा ५.५ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी ५.८ पटीने वाढून २६.२ कोटी रुपये इतका झालेला आहे.

“३० जून २०२३ ला संपणाऱ्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. या काळात कंपनीच्या एमआयएस, पाईप्स आणि टिश्यू कल्चर विभागातील उत्पादनांना चांगल्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. सकारात्मक धोरणांमुळे कंपनीने वरील विभागात चांगला मार्केट शेअर मिळवला आहे. प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या किंमतीत थोडी घट आणि खेळत्या भांडवलाचे उत्तम व्यवस्थापन यामुळे एकत्रीत संपूर्ण उत्पन्नात २० टक्के आणि तिमाहीतील वाढ कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात २६ टक्के करता आली. कंपनी संपूर्ण कर्ज कमी करणे, खेळत्या भांडवलाच्या चक्रात सुधारणा करणे आणि वाढीसह मार्जिनमध्ये पण सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. उत्पादनांत नाविन्य, शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाचे उपाय आणि वितरकांच्या जाळ्याचा विस्तार भारतात करणे यावर कंपनीचे व्यवस्थापन लक्ष केंद्रित करीत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात आम्ही सकारात्मक वाटचाल दुसऱ्या तिमाहीत करत राहू अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी दिली.

 


 

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषेचे आयोजन

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषेचे आयोजन

ताज्या बातम्या

मेहरुण येथील साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन; ‘दरबार मेरे साई का’ सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

मेहरुण येथील साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन; ‘दरबार मेरे साई का’ सोहळ्याचे आयोजन

January 22, 2026
जळगाव महापालिकेवर ‘ओबीसी’ महिला राज; आरक्षण सोडतीने इच्छुकांची गणिते बदलली!
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेवर ‘ओबीसी’ महिला राज; आरक्षण सोडतीने इच्छुकांची गणिते बदलली!

January 22, 2026
जळगाव मनपा भाजप गटनेतापदी प्रकाश बालाणी; नाशिकमध्ये गटनोंदणी पूर्ण
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा भाजप गटनेतापदी प्रकाश बालाणी; नाशिकमध्ये गटनोंदणी पूर्ण

January 21, 2026
जळगावात ‘बंधुतेचे तिळगूळ’ उपक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश
जळगाव जिल्हा

जळगावात ‘बंधुतेचे तिळगूळ’ उपक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश

January 21, 2026
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा; जळगावात पटकावले विजेतेपद

January 20, 2026
जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी
Uncategorized

जळगाव मनपा निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर संशय; सीसीटीव्ही फुटेजसह फेरमतमोजणीची माहिती देण्याची मागणी

January 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group