जळगाव, दि. १२ – ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत अमर हुतात्मांच्या स्मरणार्थ देशभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक २ च्या वतीने शुक्रवारी शहरातील महर्षी वाल्मीक चौक आसोदा रोड, येथे ‘मेरी माटी, मेरा देश’ ‘अमृत वाटिका’ ‘अमृत कलश’ अभियान राबवण्यात आले.
यावेळी आमदार सुरेश भोळे (राजुमामा), माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडल अध्यक्ष परेश जगताप, ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाचे संयोजक जयेश भावसार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक भरत सपकाळे, कांचन सोनवणे, मंडल सरचिटणीस जगदीश जोशी, आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, दीपक कोळी, महिला मोर्चा मंडल अध्यक्षा रेखा राणा, तृप्ती पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.