• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार नाटककार शंभू पाटलांना जाहीर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 6, 2023
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार नाटककार शंभू पाटलांना जाहीर

जळगाव, दि.०६ – सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य व नाट्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली आहे. यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार जळगाव येथील ख्यातनाम लेखक व रंगकर्मी शंभू पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.

निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर उपस्थित होते. शंभू पाटील यांच्या सोबत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ विचारवंत निशिकांत ठकार यांना तर शैलजा बापट, तमाशा कलावंत वसंत अवसरीकर, विश्वास वसेकर यांनाही सन्मानीत करण्यात येणार आहे.

नाट्यसेवा पुरस्कार जाहिर झालेले जळगाव येथील शंभू पाटील यांनी मराठी नाट्य परंपरा जीवंत राहण्यास मदत केली आहे. एल्गार, हा वेडा माणूस शोधतोय, अभिशाप, धर्मसत्य, अपूर्णांक व सध्या गाजत असलेले अमृता, साहिर, इमरोज व नली इत्यादी नाटकांचे लेखनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात व बाहेरील राज्यात अनेक ठिकाणी परिवर्तन कला महोत्सवांच्या निमित्ताने मराठी नाटक समृद्ध केले.

परिवर्तन ही संस्था गावोगाव नाटकांचे, सांगीतिक कार्यक्रमातून नाट्यकला जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमधे सक्रीय योगदानाचा गौरव म्हणून २५ हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह देवून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे हे ३३ वे वर्ष असून ३० ऑगस्ट २०२३ रोजी पद्मश्री विखे पाटलांच्या जयंतीदिनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांगितले. खान्देशातील रंगभूमीला पहिल्यादा हा पुरस्कार मिळाला आहे . खान्देशातील रंगकर्मीचा हा सन्मान म्हणजे खान्देशचा गौरव आहे. अशी भावना साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.

Next Post
‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांची विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

'जीएमसी'चे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांची विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group