• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

परिवर्तनतर्फे ‘श्रध्दांजली एका थोर नाटककाराला’चे आयोजन

जयंत पवार यांची श्रद्धांजली सभा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 3, 2021
in मनोरंजन
0
परिवर्तनतर्फे ‘श्रध्दांजली एका थोर नाटककाराला’चे आयोजन

जळगाव, दि. 03 –  मराठीच नव्हे तर भारतीय नाट्यसृष्टीतील महत्वाचे नाटककार, लेखक म्हणून ओळखले जाणारे जयंत पवार यांच्या दुःखद निधनाने सर्वांना धक्का बसला. त्यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. जयंत पवारांचे साहित्य, नाटकं, कथा हे शब्दरूपात आपली सोबत करणारच आहेत, त्यांच्या सोबतच्या आठवणी आपल्या सर्वांच्या मनात आहेत. परिवर्तनशी जयंत पवारांचे नातं अतिशय जिव्हाळ्याचे होते, परिवर्तनच्या सांस्कृतिक उपक्रमांना त्यांचा सतत पाठिंबा असायचा.

जयंत पवारांचं जाणं ही साहित्य व नाट्यसृष्टीसाठी दुःखद घटना असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 4 सप्टेंबर, शनिवारी सायं. ६ वा “श्रध्दांजली : एका थोर नाटककाराला” चे आयोजन परिवर्तनच्या वतीने करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम ऑनलाईन होणार असून यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे, हिंदी भाषेतील जेष्ठ कादंबरीकार व कथालेखक उदय प्रकाश, जेष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे, जेष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, जेष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, कवी श्रीकांत देशमुख, अभिनेते संजय नार्वेकर, रंगकर्मी शंभू पाटील यात सहभागी होणार आहेत. या सभेत साहित्य, नाट्य क्षेत्रातील कलावंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिवर्तनच्यावतीने नारायण बाविस्कर व मंजुषा भिडे यांनी केले आहे.

Next Post
गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

ताज्या बातम्या

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group