जळगाव, दि.२१ – शारीरिक स्वास्थ्यासाठी योग, ध्यानधारणा आवश्यक असून योगा केल्याने आपल्याला अनेक फायदे होत असतात दरम्यान आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव शहरात विविध ठिकाणी योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
२१ जून “आंतरराष्ट्रीय योग दिन” निमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हास्य परिवार तर्फे योग दिन साजरा करण्यात आला. दरम्यान आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून हास्य परिवारातील सहकाऱ्यासोबत योगाचे विविध प्रकार समजावून घेतले, व त्याचा सराव देखील केला.
यावेळी बोलताना आमदार सुरेश गोळे यांनी सांगितले की, शरीराला मानसिक शांतता प्राप्त करण्यासाठी योगांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे नियमित योगा करणे आपल्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे. अशी भावना व्यक्त केली.