जळगाव, दि.03 – शहरातील मोहाडी रोड भागात राहणारे पिंटू इटकरे यांच्या घरावर फेब्रुवारी महिन्यात दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. या दरोड्यात 18 लाख रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यातील अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती काढून त्याचबरोबर घटनेच्या दिवसाच्या अस्तित्वाबाबत ची माहिती काढत, तांत्रिक पुराव्याच्या आधारे तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
यात परभणी येथील करण सिंग तर जालना येथून तेजासिंग नरसिंग बावरी आणि ज्वालासिंग रामसिंग कलाणी अशा तिघांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस नाईक संतोष मायकल, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, परेश महाजन, मुरलीधर बारी आदी कर्मचाऱ्यांच्या पथकास जालना येथे रवाना करण्यात आले होते.
तर दुसरे पथक पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय हिवरकर, राजेश मेढे, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, महेश महाजन, किरण चौधरी, प्रवीण मांडोळे, दीपक चौधरी आदी कर्मचाऱ्यांना जळगाव येथे ठेवून दोन्ही पथक पोलीस निरीक्षक बकाले यांच्या संपर्कात राहून आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान जालना येथे गेलेल्या पथकाने गुरुगोविंद सिंग नगरात सापळा रचून किशोर सिंग उर्फ (टकल्या) रामसिंग टाक यास ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान संशयित आरोपींना विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला व इतर सर्व साथीदारांसंदर्भात माहिती दिली. यानंतर जळगावातील नियुक्त पथकाने रणजीतसिंग जीवनसिंग जुनी यास शहरातील राजीव गांधी नगरातून ताब्यात घेतले. दरम्यान संशयित आरोपी हे कुख्यात दरोडेखोर असून त्यांच्यावर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सांगितले.
तसेच चौकशीत इतर गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
पहा.. VIDEO