• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन

जैन हिल्स येथील संमेलनात १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 27, 2023
in कृषी, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन

जळगाव, दि.२७ – जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमात महाराष्ट्र व गुजरातमधील १५५ सरकारी अनुदानित ग्रामीण शाळांमधील १०८५ विद्यार्थी सहभागी होत आहेत. शाळांमधील इन्होवेशन व कृषी व्यवसाय योजना स्पर्धांचे विजेते असलेले ८ वी व ९ व्या इयत्तेतील विद्यार्थी संमेलनामधे सादरीकरण करतील. संमेलन आयोजनाचे हे ९ वे वर्ष असून ते १ व २, ४ व ५, आणि ७ व ८ जून अशा तीन टप्प्यामधे जैन हिल्स जळगाव येथे पार पडेल.

फाली या अत्यंत अनोख्या आणि प्रभावशाली कार्यक्रमाने १३,००० विद्यार्थ्यांसह नववे वर्ष पूर्ण केले आहे. आधुनिक, शाश्वत शेती आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक, व्यवसाय आणि नेतृत्व काैशल्ये आणि संधी देऊन पुढील पिढी शेती क्षेत्राकडे आकर्षित व्हावी यासाठी फाली कार्यरत आहे.

असोसिएशन फाॅर फ्युचर अग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडियाची स्थापना कंपनी कायदा कलम ८ अंतर्गत झाली आहे. कंपनीचे संचालक : नादिर गोदरेज – गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, राजू श्राॅफ-यूपीएलचे अध्यक्ष, अनिल जैन – जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नॅन्सी बॅरी – एनबीए एंटरप्राइझ सोल्युशन्स टू पाॅव्हर्टीच्या अध्यक्षा यांचा समावेश आहे. फालीमधील प्रमुख सीएसआर योगदानकर्ते गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, जैन इरिगेशन, स्टार अग्री, रॅलीज आणि ऑम्निवोर या कंपन्या आहेत. या अर्थिक वर्षात फालीला सहकार्य देण्यासाठी इतर अनेक अग्रगण्य कृषी व्यवसाय आणि बँका सामील होण्याची शक्यता आहे.

फालीचे दोन दिवसीय होणारे ३ समान भागांमध्ये नववे संमेलन जूनच्या पहिल्या आठवड्यात जैन इरिगेशन जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. फालीच्या १०८५ विद्यार्थ्यांसोबत कंपन्या आणि बँकांचे ५० हुन अधिक प्रतिनिधी सामील होतील जे फालीला सीएसआर निधीतून सहकार्य करतात. क्षेत्र भेटीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात, वेबिनार आणि फाली इनोव्हेशन फिल्म्समध्ये भाग घेतात आणि नाविन्यपूर्ण स्पर्धाचे परीक्षण करतात. फाली अधिवेशनात भाग घेणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक या तरुण लीडरला मार्गदर्शन करतात आणि त्यांना शेती व्यवसाय करण्यास प्रेरित करतात. फालीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी फालीचे माजी विद्यार्थी देखील अधिवेशनाला उपस्थित राहतात.

Next Post
निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक
जळगाव जिल्हा

नर्मदेच्या पाण्याने स्वयंभू महादेव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक

June 6, 2023
शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद
कृषी

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद

June 4, 2023
वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
जळगाव जिल्हा

वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

June 4, 2023
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास

June 4, 2023
शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज
कृषी

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

June 4, 2023
अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.