• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘सत्य’ जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक.. – बरूण मित्रा

दोन दिवसीय गांधी विचार संस्कार परीक्षा परिसंवाद संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 28, 2023
in जळगाव जिल्हा
0
‘सत्य’ जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक.. – बरूण मित्रा

जळगाव, दि.२८ – महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत अनेक प्रयोग केले. त्यातून समजून घेणे व सत्य स्वीकारले. मुलांमधील जिज्ञासा वाढीस लागून त्यासाठी विविध प्रयोग करण्याची सवय शिक्षकांनी आपल्या कृतीतून लावली पाहिजे, असे प्रतिपादन शाश्वत विकासाचे प्रणेते बरुण मित्रा यांनी केले. गांधी विचार संस्कार परीक्षा परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. गीता धर्मपाल, डॉ. अश्विन झाला, उदय महाजन व गिरीश कुळकर्णी उपस्थित होते. आपल्या मनोगतात बरूण मित्रा पुढे म्हणाले कि, देशातील तरुणाई हि संधी का? आपत्ती ठरणार हे शिक्षकांवर अवलंबून आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हाताने काम करण्याची व श्रम प्रतिष्ठेची आवश्यकता आहे. आयुष्यभर चालणारी शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले. त्याद्वारेच देशात अपेक्षित बदल अनुभवता येईल असेही ते म्हणाले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे मागील १६ वर्षांपासून गांधी विचार संस्कार परीक्षा घेतली जाते. आजपर्यंत २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रातिनिधिक समन्वयकांसाठी दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन गांधी तीर्थ येथे करण्यात आले होते. १६ जिल्ह्यातील ४० परीक्षा समन्वयकांनी यात सहभाग घेतला.

डॉ. गीता धर्मपाल यांनी आपल्या मनोगतात भारताला विश्वगुरुपदी विराजमान करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचारांना प्रत्यक्षात कृतीत आणण्याची आवश्यकता विविध उदाहरणाद्वारे प्रतिपादित केली. तरुणाई हि भारताची संपत्ती असून तिला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक प्रभावीपणे करु शकतात असेही त्या म्हणाल्यात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. संदीप काळे, वर्षा अहिरराव, सिध्दराज भांदिर्गे, डॉ. बी. टी. शिंदे, जे. एस. महाजन, पूजा अलापुरीया आदींनी मनोगत व्यक्त केले. पाटस येथील बी. टी. शिंदे, लातूर येथील डॉ. संभाजी पाटील, सातारा येथील सिध्दराज भांदिर्गे, नंदुरबार येथील अविनाश सोनेरी, सत्रासेन चोपडाचे बी. एस. पवार व बारामती येथील शंकरराव माने यांचा विशेष गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

गांधी विचार संस्कार परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींवर परिसंवादात चर्चा करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी पीस वॉकचा आनंद घेतला. आगामी काळातील नियोजनावर परिसंवादात चर्चा करण्यात आली. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनसोबत करता येणाऱ्या विविध उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली. चंद्रशेखर पाटील, विश्वजित पाटील, योगेश संधानशिवे, तुषार बुंदे, सुधीर पाटील, अशोक चौधरी, सविता महाकाल, सीमा तडवी व शुभांगी बडगुजर यांनी परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.


Next Post
बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म रॅलीसह विविध कार्यक्रम संपन्न

बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म रॅलीसह विविध कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

श्री रामदेवबाबांच्या दशमी उत्सवाची सांगता, गुरुनानक नगरात भंडाऱ्याचे आयोजन

September 3, 2025
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद
खान्देश

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाची लूट, २ चोरटे जेरबंद

September 2, 2025
अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात पिस्तूल विक्री करणारे; १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2025
अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न, नंतर मारहाण; प्रियकरासोबत गेल्यावर १० जणांवर गुन्हा

September 1, 2025
२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
खान्देश

२१ वर्षीय तरुणाची हत्या; दोन संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

August 30, 2025
जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
कृषी

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात रोग व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

August 30, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group